पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू, लागल्या होत्या तीन गोळ्या

Gangster Sharad Mohol Killed:-  पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड येथे भरदिवसा गोळ्या झाडण्यात आल्या. कोथरुडमधील सुतारदरा भागात हा गोळीबार झाल्याची माहिती समजत आहे. शरद मोहोळला तीन गोळ्या लागल्याची माहिती आहे. गोळीबारानंतर त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, कोथरुड भागात दहशत असलेला शरद मोहोळवर दुपारी सुतारदरा परिसरात दुपारी दीड वाजता हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. या घटनेत मोहोळ गंभीर जखमी झाला. हल्लेखोर तेथून पसार झाले. यानंतर शरद मोहोळला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झाला आहे. पूर्ववैमन्यासातून शरद मोहोळची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.