मी मारहाण केलीच नाही, फक्त ढकललं; व्हायरल व्हिडीओवर भाजप आमदार सुनील कांबळेंचं स्पष्टीकरण

Sunil Kamble Slaps Police: पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीया करीता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमावेळी भाजपा आमदार सुनील कांबळे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले. सुनील कांबळे यांनी भर कार्यक्रमात एका पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मारहाणीच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत असूनही भाजप आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्यास नकार दिला आहे. भाजप आमदार सुनील कांबळे बोलताना म्हणाले की, “मी कार्यक्रमातून बाहेर पडलो. सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला नव्हता, गोळ्या घ्यायच्या होत्या त्यामुळे घाईगडबडीत बाहेर पडलो. कार्यालयात आल्यावर मला माहिती पडलं की, हे सगळं लाईव्ह सुरू झालेलं आहे. काय झालंय हेच मला कळालं नाही, मी कोणालाच मारहाण करण्याचा संबंधच नाही. तो कोण व्यक्ती आहे, मी त्याला ओळखत नाही, मी का मारू त्याला?”

“मी समोरुन स्टेजवरुन उतरत असताना तो आडवा आला, मी त्याला ढकलून बाजूला झालो आणि तिथून लगेच निघालो. वाद झाला असता, मारहाण करायची असती त्याला, तर तिथे थांबलो असतो. मी बाजूला आलो.”, असं कांबळे म्हणाले.

“कोणीही आरोप केला असेल, पण मी त्यांना ओळखत नाही आणि ते मला ओळखत नाही. रुपाली चाकणकरांसोबत मी चालत होतो, त्यावेळी त्यांनी म्हटलं अरे आमदारांना पुढे जाऊ द्यात. तरी ते धक्का मारत होते, तिथे जे पोलीस होते त्यांनी बाजूला नेलं खाली त्यांचं जिन्यात काय झालं मला नाही माहिती, मी कार्यक्रमात निघून गेलो.”, असंही सुनील कांबळे म्हणाले. “राग प्रशासनावर काढायचा होता तर तो पत्रकारांशी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी काढण्याचा संबंध काय? मी कलेक्टरांशी बोललो, स्थानिक आमदार म्हणून कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं नाराजी होती.”, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात