“चांगला खेळला तर चांगले पैसे मिळतील आणि…”, शमीच्या कामगिरीवर पत्नीचे विचित्र विधान

Mohammad Shami Wife Hasin Jahan: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने विश्वचषक 2023 (CWC 2023) मध्ये चमकदार कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत. अनुभवी उजव्या हाताच्या गोलंदाजाच्या उत्कृष्ट गोलंदाजीने भारतीय चाहत्यांसोबतच क्रिकेट जगतातील अनेक माजी दिग्गजही प्रभावित झाले आहेत. मात्र, दरम्यान शमीची पत्नी हसीन जहाँने स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवर एक विचित्र विधान केले असून, या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

व्हिडिओमध्ये हसीन जहाँ शमीच्या स्पर्धेतील कामगिरीबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. नुकतीच हसीन जहाँ न्यूज नेशन वाहिनीच्या कार्यक्रमात पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. यादरम्यान शोच्या होस्टने तिला सांगितले की शमीने वर्ल्ड कपमधील तीन सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत आणि अनेक जुने रेकॉर्ड मोडले आहेत. एक चाहती म्हणून तुम्ही त्याच्या कामगिरीबद्दल काही प्रतिक्रिया देऊ इच्छिता?

याला उत्तर देताना हसीन जहाँ म्हणाली की, “मी क्रिकेटची फॅन नाही आणि मी ते बघतही नाही, त्यामुळे कोणी किती विकेट घेतल्या हे मला माहीत नाही. जर तो (शमी) चांगली कामगिरी करत असेल आणि चांगला खेळत असेल तर तो संघात कायम राहील. जर आपण चांगली कमाई केली तर आमचे भविष्य सुरक्षित होईल. यापेक्षा चांगले काय आहे?”

त्यानंतर पत्रकाराने हसीन जहाँला विचारले की, तुम्ही टीम इंडिया आणि शमीला नक्कीच शुभेच्छा देऊ शकता. याला प्रत्युत्तर देताना भारतीय गोलंदाजाच्या पत्नीने सांगितले की, “मी टीम इंडियाला शुभेच्छा देईन पण शमीला नाही.”

33 वर्षीय गोलंदाज आणि हसीन जहाँची प्रेमकहाणी आयपीएल 2011 दरम्यान सुरू झाली होती. यानंतर दोघांनी 2014 मध्ये लग्न केले, मात्र चार वर्षानंतर हसीन जहाँने शमीवर गंभीर आरोप करत केस दाखल केली. तेव्हापासून हसीन जहाँ तिच्या मुलीसह भारतीय गोलंदाजापासून वेगळी राहत आहे. शमी तिला दरमहा सुमारे 1 लाख 30 हजार रुपये देखभाल भत्ता देतो. दोघांमधील घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’