लग्न करेल…; महाराष्ट्राची हरिणी गौतमीचे लग्नाची मागणी घालणाऱ्या बीडच्या ‘त्या’ पाटलाला उत्तर

नुकतीच बीडच्या रोहन गलांडे पाटील या तरुणाने नृत्यांगणा गौतमी पाटील हिला लग्नाची मागणी घातली होती. बीड जिल्ह्यातील केजच्या चिंचोलीमाळी येथील शेतकरी पुत्र रोहन पाटीलने गौतमीला (Gautami Patil) लग्नाची मागणी घालणारे पत्र पाठवले होते. यावर आता गौतमीने रोहन पाटीलला पत्राद्वारे निरोप पाठवला आहे.

रोहन गलांडे पाटील (rohan patil) याने गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं की, की गौतमी पाटील तू होती का माझी परी, मी रोहन गलांडे पाटील मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तुझ्या सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुणी लग्नाला तयार नसले तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे आणि मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर मला भेटायला ये. मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. असे रोहन गलांडे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

यावर आता प्रत्युत्तर देत गौतमीने लिहिले की, माझी सध्या तरी लग्न करण्याची इच्छा नाही. जेव्हा लग्न करेल तेव्हा नक्की आपल्याला कळवेल. असे म्हणून गौतमीने तुर्तास वेळ मागून घेतला आहे.