काँग्रेसला प्रेमाच्या दुकानात रस नाही. तर त्यांना फक्त “स्वतःचे दुकान” उभारण्यातच रस आहे!

Prakash Ambedkar – हरियाणातील नूह हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचे मुस्लिम आमदार मम्मन खान यांच्या अटकेविरोधात काँग्रेस नेतृत्वाकडून काही निषेध किंवा वक्तव्य करण्यात आले आहे का? असा थेट सवाल विचारत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

त्यांनी ट्वीट करत पुढे विचारले आहे की, माझ्या मुस्लीम बंधू-भगिनींसाठी हा चिंतनाचा विषय आहे की, जेव्हा काँग्रेस नेतृत्व स्वतःच्या मुस्लिम आमदारासाठी उभे राहू शकत नाही, तेव्हा तुम्ही आणि मी त्यांच्याकडून संपूर्ण मुस्लिम समाजासाठी उभे राहण्याची अपेक्षा कशी करू शकतो? काँग्रेसला प्रेमाच्या दुकानात रस नाही. तर त्यांना फक्त “स्वतःचे दुकान” उभारण्यातच रस आहे! असा घणाघाती हल्ला त्यांनी कॉग्रेस पक्षावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल