एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे आवडता नेता कोण? या प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाली…

Pune: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil), ‘गौतमीकी झलक सबसे अलग’….. सध्या लावणी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येतं ते म्हणजे गौतमी पाटीलचं. अश्लील डान्समुळे चर्चेत आलेल्या गौतमीच्या नृत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलयं. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीचे कार्यक्रम पाहण्यास गर्दी करतात. गौतमीच्या डान्ससह ती वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

गौतमीचे कुटुंबीय, तिच्या आवडीनिवडी याबद्दल जाणून घेण्याची नेहमीच लोकांना उत्सुकता असते. अशातच गौतमीने ‘द ऑड इंजिनियर’ या सोशल मीडिया चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वेगवेगळ्या प्रश्नांची तिच्या हटके स्टाईलमध्ये उत्तरं दिली आहेत. यादरम्यान तिला महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर तिने लक्षवेधी उत्तर दिले आहे.

‘द ऑड इंजिनियर’ या सोशल मीडिया चॅनलवरील मुलाखतीतील रॅपिड फायरमध्ये एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?, असा प्रश्न गौतमीला विचारण्यात आला. तिला दोन्हीपैकी एक नाव निवडायचं होतं. पण तिने त्यावर उत्तर देणं टाळलं.  ‘तू मला मार खायला लावणार की तू माझा मार खाणार’, असं ती हसत अँकरला म्हणाली.