शिंदे गटाकडून दिवाळीनिमित्त ठाण्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम; सुषमा अंधारे भडकल्या

Sushma Andhare Vs Shivsena : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांच्यावतीने ठाण्यात दिवाळी पहाट निमित्ताने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली. यावेळी अंधारेंनी शिंदे गटाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचीही आठवण करून दिली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पंडीत बिस्मिल्ला साहेबांची सनई, पंडीत भीमसेन जोशी यांची भक्तीगीते किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळं ऐकून होतो. आज ठाण्यामध्ये उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच काय, अवघ्या महाराष्ट्रालाही अपेक्षित नसेल.

महत्वाच्या बातम्या-

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत

डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी या योगासनांचा सराव करा, आयुष्यभर लागणार नाही चष्मा!

Beetroot Carrot Juice: गाजर आणि बीटरूटचा रस हिवाळ्यात आहे खूप फायदेशीर, जाणून घ्या त्याचे काही आश्चर्यकारक फायदे