जनजागृतीच्या नावाखाली प्रसिद्धी! मुंबई पोलिसांनी Poonam Pandeyवर कठोर कारवाई करावी – आमदार सत्यजीत तांबे

Poonam Pandey Death: अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हिने गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे आपले निधन झाल्याची खोटी बातमी पसरवली होती. दुसऱ्या दिवशी आपण जिवंत आहोत असे सांगत गर्भाशय कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे तिने सांगितले. मात्र अभिनेत्रीच्या या पावलावर अनेकांनी सडकून टीका केली आहे. आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी या प्रकरणी पूनम पांडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सत्यजीत तांबे म्हणाले, पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी हा पब्लिसिटी स्टंट ठरला. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल (Cervical Cancer) जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावशाली मॉडेलचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली. यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचे गांभीर्य लक्षात न घेता संपूर्णपणे लक्ष पूनम पांडेकडे वेधले गेले. यावरून जनजागृती करण्याऐवजी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा प्रसिद्धी मिळवण्यासाठी विनोद करण्यात आला हे लक्षात येते. तसेच वृत्तसंस्थांनी वस्तुस्थितीची पडताळणी न करता मृत्यूच्या बातम्या प्रसारित केल्या यावरून मीडियाचा वापर चुकीच्या मार्गाने आपला अजेंडा साध्य करण्यासाठी केला जात आहे.

सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती तसेच केवळ प्रसिद्धीसाठी,लक्ष वेधण्यासाठी माध्यमांचा गैरवापर करणे हे आक्षेपार्ह आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पूनम पांडेवर कारवाई करावी आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९५ (१) अंतर्गत अशा प्रकारे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर स्टंट करणाऱ्यांना चेतावणी देणे आवश्यक आहे, असेही सत्यजीत तांबे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Vijay Thalapathy | सुपरस्टार विजय थलपतीची राजकारणात एन्ट्री, पक्षाचीही केली घोषणा; पाहा लोकसभा लढवणार का?

Supriya Sule | …म्हणून देवेंद्र फडणवीसांची तक्रार सुप्रिया सुळे आता थेट अमित शाह यांच्याकडे करणार

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महेश गायकवाड यांची भेट, रुग्णालयात जाऊन प्रकृतीची केली विचारपूस