मराठा आरक्षण मिळेपर्यंत राज्यात नोकरभरती नको; मनोज जरांगेंची मागणी

Manoj Jarange Patil – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत असल्याने ऐन थंडीत राज्यातील वातावरण तापले आहे. यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी एक अजब मागणी केली आहे. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्यात नोकरभरती करू नयेत अशी नवी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या वतीने महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत बोलतांना मनोज जरांगे यांनी ‘मराठा आरक्षण मिळेपर्यंत राज्यात नोकरभरती कर नयेत’ असा मुद्दा मांडला. त्यांच्या याच मागणीला उपस्थितीत मराठा बांधवांनी होकार दर्शवला आहे.

दरम्यान यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या लेकरांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत या राज्यात नोकरभरती करायची नाही. जर, तुम्हाला नोकरभरती करायची असेल, तर मराठ्यांना काही हरकत नाही. मराठे कुणाच्याही लेकरांचं वाटुळं होऊ देणार नाही. पण, नोकरभरती करण्याचा निर्णय घेतांना मराठ्यांच्या सर्व जागा राखी ठेवून नोकरभरतीचा निर्णय घ्या, तर आम्हाला मान्य आहे, असे जरांगे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न?

जान्हवी कपूर आणि नीसा देवगण ‘या’ व्यक्तीसोबत लंडनमध्ये करत आहेत सुट्या एन्जॉय

एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या, त्यामुळंचं त्यांना पक्षानं हाकलून दिलं – महाजन