ना बॅनरबाजी ना चमकोगिरी; नेत्याचा वाढदिवस कसा असावा याचे गिरीश खत्रींनी सादर केले उत्तम उदाहरण

 

पुणे – राजकीय नेत्यांचे वाढदिवस साधारणपणे कसे साजरे केले जातात हे सर्वाना ठावूकच आहे. नेत्यांचा वाढदिवस म्हटल्यावर मोठमोठे फ्लेक्स, डीजे, हार-तुरे, पुष्पगुच्छ, मोठे केक हे सर्व आलचं. मात्र खूप थोडे राजकीय नेते आहेत जे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात. या अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे पुण्यातील भाजपनेते गिरीश खत्री.(Girish Khatri sets the perfect example of how a leader’s birthday should be)

गिरीश खत्री यांचा आज वाढदिवस असून अनेक सामाजिक, अध्यात्मिक तसेच आरोग्याशी निगडीत उपक्रम राबवत आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस यादगार बनवला. खत्री यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिरात काकडआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः उपस्थित राहिले. पाटील हे नुसते उपस्थित राहिले नाहीत तर त्यांनी फुगडी देखील खेळली. या उपक्रमाची माध्यमांनी देखील दखल घेतली.

यानंतर त्यांनी वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम पुणे येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेतला. यावेळी जेष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला तसेच त्यांचे आशीर्वाद देखील घेतले. यानंतर त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर आणि पाताळेश्वर नागुमाता या ऐतिहासिक अशा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी जहांगीर हॉस्पिटलला भेट दिली यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी डॉ.रितेश चांदुरे आणि मधुरा दाते हे उपस्थित होते.

यानंतर डोणजे येथील आपलं घर येथे किराणा आणि फळ भाज्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप केले. यावेळी खत्री यांनी लहान मुलांशी संवाद देखील साधला. संध्याकाळी त्यांच्या सहकाऱ्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमिताने गायक आनंद दीक्षित यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या ठिकाणी देखील खत्री यांनी हजेरी लावली. त्यामुळे एकंदरीतच समाजोपयोगी उपक्रम राबवत खत्री यांनी एका नेत्याचा वाढदिवस कसा असावा यांचे एक उत्तम सादर केले आहे.