दिलगिरी व्यक्त करा अन्यथा महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल; मिटकरींचा सत्तारांना इशारा 

मुंबई –  कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी बोलताना सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना ऑन कॅमेरा शिवीगाळ केली.

यावेळी सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर देण्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवीदेखील घातली. इतकी भिकार**  झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ… असं उत्तर त्यांनी दिलं.

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. अब्दुल सत्तार आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलु शकतो. मात्र आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही .आदरणीय सुप्रियाताई बद्दल वापरलेले अपशब्द 24 तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या. नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.