वधू-वर नुपूर आणि आयरा ग्रँड वेडिंगसाठी उदयपूरला रवाना, आमिर खानही मुलासह दिसला

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान सासरा झाला आहे. त्याची लाडकी मुलगी आयरा खानने नुकतेच तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज केले आणि आता दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत.

आयरा खानने 3 जानेवारी 2024 रोजी मुंबईत नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज केले होते. आता आयरा आणि नुपूर उदयपूरमध्ये भव्य लग्न करणार आहेत. वृत्तानुसार त्यांच्या लग्नाचे विधी 7 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्यासाठी आज हे जोडपे आपल्या कुटुंबासह उदयपूरला पोहोचले आहे.

आयरा खानचे ग्रॅण्ड वेडिंग उदयपूरमध्ये होणार आहे
शुक्रवारी आयरा खान तिचा नवरा नुपूर शिखरे आणि कुटुंबासह उदयपूरला पोहोचले. वधू आयरा हिरव्या रंगाच्या को-ऑर्डर सेट आणि बूटमध्ये स्टायलिश दिसत होती. तर नुपूर कॅज्युअल लूकमध्ये दिसला. आयरा आणि नुपूर व्यतिरिक्त वधूची आई रीना दत्ता (Amir Khan Ex Wife) आणि कुटुंबातील इतर सदस्य विमानतळावर दिसले.

आमिर खान मुलीच्या लग्नासाठी निघाला
आमिर खान आपली मुलगी आयरा खानच्या लग्नासाठी उदयपूरला रवाना झाला आहे. तो मुलगा आझादसोबत (Amir khan Son Azad) मुंबईतील खासगी विमानतळावर दिसला. यावेळी आमिर लाल रंगाचा कुर्ता आणि पायजमामध्ये दिसला. त्यांचा मुलगा आझाद कॅज्युअल टी-शर्ट आणि लोअरमध्ये वडिलांसोबत पापाराझीसाठी पोज देताना दिसला.

उदयपूरमध्ये आयरा खानचे लग्न कधी?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयरा खानच्या लग्नाचे विधी 7 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. 10 जानेवारीला तिचे आणि नुपूरचे रितीरिवाजानुसार लग्न होणार आहे. आयरा आणि नुपूरची ग्रँड रिसेप्शन पार्टी 13 जानेवारीला मुंबईत आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये बी-टाऊनचे अनेक प्रसिद्ध स्टार्स उपस्थित राहू शकतात.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात