‘पनीर पसंदा’ची रेसिपी यावर्षी गुगलवर झालीय सर्वाधिक सर्च, टॉप-१०मध्ये महाराष्ट्राचा ‘हा’ पदार्थही

Google Year In Search 2022: पनीर म्हणजे प्रेम आहे. लग्न असो वा कोणता खास दिन, खाण्यामध्ये पनीर हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो. लोकांना पनीरचे पदार्थ फक्त खायलाच आवडत नाहीत, तर ते बनवायलाही आवडतात. यामुळेच स्नॅक्सपासून भाज्यांपर्यंत पनीरच्या पदार्थांची यादी मोठी आहे. पण या सर्वात वरती एक डिश आहे, जी 2022 मध्ये फक्त भारतातच नाही तर जगभरातील लोकांनी सर्वाधिक सर्च केली आहे. लोकांनी ही डिश गुगलवर इतकी सर्च केली की ती गुगलवर प्रसिद्ध झाली आणि पहिल्या क्रमांकावर आली आहे.

‘पनीर पसंदा’ असे या डिशचे नाव आहे. होय, पनीरच्या या डिशला जागतिक आणि भारतीय दोन्ही स्तरावर Google Top Search 2022 मध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे. मुघल पाककृतीपासून उगम पावलेली, ही डिश भारतीय पाककृतीमध्ये पनीरसह शाकाहारी बनवली गेली आणि आज घरोघरी ही आवडती डिश बनली आहे. मुघल कूक या डिशमध्ये पनीरऐवजी मीट (नॉनव्हेज)चा वापर करतात. गुगलने टॉप रेसिपीमध्ये पनीर पसांदाचा समावेश केला आहे.

एप्रिल महिन्यात या डिशला गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पनीरच्या दोन डिशचा गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप टेन रेसिपीमध्ये समावेश आहे. पनीर पसंदासोबतच लोकांनी पनीर भुर्जी, मोदक, चिकन सूप, पिझ्झा मार्गेरिटा आणि कॉकटेल पोर्नस्टार मार्टिनीलाही गुगलवर सर्च केले आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

या आहेत भारतातील टॉप सर्च रेसिपीज
1. पनीर पसंदा
2. मोदक
3. सेक्स ऑन द बीच – कॉकटेल
4. चिकन सूप
5. मलाई कोफ्ता
6. पॉर्नस्टार मार्टिनी – कॉकटेल
7. मार्गरिटा पिझ्झा
8. पॅनकेक
9. पनीर भुर्जी
10. अनारसे – महाराष्ट्रातील स्नॅक्स रेसिपी

या आहेत जगभरातील टॉप ट्रेंडिंग रेसिपीज
1. पनीर पसंदा
2. बोलो कैसीरो- ब्राजीलियाई केक
3. तुज्लु कुराबिये- तुर्की कुकीज
4. ओवरनाइट ओट्स
5. जिम्टश्नेकेन – पेस्ट्री
6. इर्मिक हेलवासी – तुर्की मिठाई
7. Pankeyki – पॅनकेक
8. बाबा गनौश – भाजलेल्या वांग्याची डिश
9. बुलगुर पिलाव – तुर्की चावल डिश
10. पास्ता सलाद