मनोज जरांगे यांच्या करमाळ्यातील सभेकडे मराठा समाजाने फिरवली पाठ

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यामुळे चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील यांच्या करमाळ्यातील सभेकडे मराठा समाजाने पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. करमाळा तालुक्यातील दिवे गव्हाणमध्ये जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, पण सभेला गर्दी न झाल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी खंत व्यक्त केली. ‘असं मोकळं ग्राऊंड दिसलं की चव जाते. लोकांमध्ये गैरसमज जातात. पसरवणारेही गैरसमज पसरवतात. बैठक असो किंवा सभा असो ग्राऊंड भरलं नाही असं झालंच नाही. गावाची बैठक अशी पटांगणात डोंगरात घेतल्यासारखी घेतली तर तिथे कितीही लोक आले तरी कमीच दिसणार आहेत’, असं जरांगे पाटील म्हणाले.न्यूज १८ लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय टीका टिपण्णी सुरु केल्यापासून सातत्याने त्यांचा जनाधार कमी होत असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी त्यांच्यावर टीका न करता आता दुर्लक्ष करत असल्याने हा संघर्ष देखील कमी होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार