Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीच्या चर्चांमुळे विरोधक धास्तावले ?

Murlidhar Mohol Banners | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपसह काँग्रेस व इतर पक्षांकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार यांच्यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच मोहोळ यांच्या विरोधातील बॅनर्स महापालिका परिसरात लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे.

मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या विरोधात ‘स्टॅंडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण दिलं आता तुला पाडणार’, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते, हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यानंतर लागलीच ते हटवण्यात आले. परंतु लावणाऱ्याने देखील त्याची व्यवस्थित चर्चा होईल याची दक्षता घेतल्याचं दिसत आहे. राजकीय नेत्यांवर टीका करणारे असे “पुणेरी” बॅनर्स लावण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांबद्दल असे पोस्टर लावण्यात आलेले होते. परंतु लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपच्या प्रबळ दावेदारा विरोधातील हे बॅनर्स असल्याने चर्चा झाली नाही तर नवलच.

मोहोळांच्या उमेदवारीची विरोधकांना चिंता की स्वकीयांना धास्ती
भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात करणारे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या कामाच्या जोरावर युवा मोर्चापासून पक्षात काम केले आहे. भाजपची पहिल्यांदाच महापालिकेत सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात आले तर लागलीच महापौर पदी काम करण्याची संधी देखील पक्षाकडून मोहोळ यांना मिळाली. आपल्या महापौरपदाच्या काळात कोरोनाच्या महामारीत त्यांनी केलेल्या कामामुळे संपूर्ण शहरात एक वेगळी ओळख निर्माण झाली. तर आज मोहोळ हे प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. मोहोळ यांच्या सारखा उमेदवार लोकसभेसाठी दिल्यास हमखास विजयी होण्याची शक्यता असल्याने भाजप पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला पसंती दिली जात असल्याची चर्चा आहे.

मोहोळ यांचे लोकसभा उमेदवार म्हणून नाव निश्चित मानले जात असतानाच आज लागलेले बॅनर हे विरोधी पक्षातील नेत्यांनी लावलेले डोके आहे, की मोहोळ यांची वाढती लोकप्रियता, पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीवर असणारी पसंती, यामुळे भाजपमधीलच एखाद्या इच्छुकाने केलेला हा “कार्यक्रम” आहे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं