Govt Scheme : व्यायामशाळा विकास अनुदान कसं मिळवायचं ? ७ लाख रुपये मिळू शकतात…

अनुदानासाठी पात्र संस्था:

■ शासकीय शाळा, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कटक मंडळे, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक संस्था

■ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च शिक्षण विभागांनी मान्यता दिलेल्या शाळा, महाविद्यालये तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासनामार्फत मान्यता व अनुदान मिळण्यास प्रारंभ होऊन ५ वर्ष पूर्ण झालेल्या शाळा व महाविद्यालये

■ क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी, पोलीस विभाग, शासकीय कार्यालये, जिमखाना

अनुदानाच्या आवश्यक बाबी:

■ व्यायामशाळेच्या उभारणीकरीता संस्थेच्या मालकीची किमान ५०० चौरस फुट जागा

■ संस्थेचा बंदिस्त हॉल असल्यास व्यायामशाळा साहित्याकरीता अनुदान.

■ संस्थेकडे १ हजार चौरस फुट चटई क्षेत्र असल्यास व्यायामशाळेच्या बांधकामासाठी अनुदान

अनुदान 

अनुदानासाठी पात्र असणाऱ्या संस्था, कार्यालये यांना १०० टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त रुपये ७ लाख रुपये.

संपर्क:- जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे-६, ईमेल [email protected]

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय,पुणे