श्री श्री रविशंकर यांचा जागर भक्तीचा या कार्यक्रमाचे तिर्थक्षेञ तुळजापूरात आयोजन

तुळजापूर – जगाला शांतीचा संदेश देणारे अध्यात्मिक संत गुरुदेव श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) जी यांच्या उपस्थित २ फेब्रुवारी २०२३ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे जागर भक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहीती राज्य समन्वयक नंदकिशोर औटी यांनी सोमवार दि. १६ रोजी पञकार परिषद घेत दिली

यावेळी बोलताना विभागीय समन्वयक मकरंद जाधव (Makarand Jadhav) म्हणाले की, जगात देशात भक्तीकी लेहर अंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून दि.२ फेब्रुवारी वार गुरुवार रोजी सायंकाळी ६ वाजता कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तुळजापूर नगरीत परम पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या उपस्थितीत जागर भक्तीचा हा महासत्संगाचा कार्यक्रम नळदुर्ग-तुळजापूर रोड वरील सैनिकी शाळेच्या मैदानावर संपन्न होणार आहे.यावेळी गुरुदेवांचा सहवास लाभणार असून सर्वांना जागर भक्तीचा या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

व्यक्ती विकास केंद्र बेंगलोर यांच्या माध्यमातून जगातील १८० पेक्षा अधिक देशात पूज्य गुरुदेवांच्या माध्यमातून विविध धार्मिक,सामाजिक व शैक्षणिक कार्य चालू आहे.हिंदू धर्माची चालत आलेली गुरू परंपरा पुढे घेऊन जाण्याचे कार्य गुरुदेवांच्या माध्यमातून जगात चालू आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.या पवित्र आशा मातीत छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य रक्षणासाठी प्रेरणा व आशीर्वाद देणारी आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारी भक्तीची लेहर ही “जागर भक्तीचा” माध्यमातून घेऊन येत आहोत.

जागर भक्तीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पवित्र असलेल्या तुळजापूर नगरीत पुन्हा एकदा अध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सकारात्मक शक्ती व भक्ती संगम आपणास अनुभव येणार आहे.महाराष्ट्र सह कर्नाटक व तेलंगणा राज्यातील जवळपास ५० ते ६० हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीने राज्यातील विविध भागात व इतर राज्यात विविध माध्यमातून या कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक कार्य करीत आहेत. आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारात होणाऱ्या या कार्यक्रमाला आपण सह परिवार उपस्थित राहून जागर भक्तीचा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार महाराष्ट्र,धाराशिव व तुळजापूर आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने राज्य समन्वयक श्री नंदकिशोर आवटी , मराठवाडा विभागीय समन्वयक मकरंद जाधव , जेष्ठ प्रशिक्षक डॉ उदयसिंह मोरे , नितिन भोसले, डॉ जितेंद्र कानडे , प्रशांत संकपाळ , सचिन सुर्यवंशी , डॉ राहुल पाटील , शशिकांत कदम , राजू देशमुख , नागेश नाईक , सचिन कदम परमेश्वर , विजय भगरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.