Big Boss Winner: कोट्यवधींची चेन, ८० हजारांचे बूट; ‘बस्ती की हस्ती’ एमसी स्टॅनची संपत्ती माहितीय का?

Pune: लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस सीझन १६’ चा (Big Boss Season 16) विजेता ठरला आहे. प्रचंड मतांनी एमसी स्टॅनने (MC Stan) प्रियंका चाहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) आणि प्रिय मित्र शिव ठाकरे (Shiv Thakare) यांचाही पराभव केला. स्टॅनचा ‘बिग बॉस’चा प्रवास रोलर कोस्टरसारखा राहिला आहे. तो रडला, दुःखी आणि उदास झाला, स्वेच्छेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, परंतु गेल्या काही आठवड्यांत त्याच्या सक्रिय व्यक्तिमत्त्वाने संपूर्ण खेळ बदलला.

एमसी स्टॅन ‘बिग बॉस १६’ चा विजेता (Big Boss Winner) होईल असे कोणालाही वाटले नव्हते, कारण बाकी स्पर्धकांच्या तुलनेत स्टॅनचा सहभाग खूपच कमी होता. सुरुवातीला, तो रिऍलिटी शोमध्ये राहू शकला नाही आणि त्याच्या हकालपट्टीचे दिवस मोजत होता. अनेकवेळा ‘बिग बॉस’ने त्याला जागे केले. एकदा त्याला नैराश्यही आले आणि मग त्याने स्वेच्छेने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिग बॉसमध्ये त्याला वारंवार लक्ष्य करण्यात आले. या सर्व अडथळ्यांनंतरही आता अखेर तो बिग बॉसचा विजेता ठरला आहे. विजेता म्हणून ‘बस्ती की हस्ती’ एमसी स्टॅन याला ३१ लाख ८० हजार रुपये आणि एका कार मिळाली आहे. सध्या एमसी स्टॅन तुफान चर्चेत आहे.

एमसी स्टॅन मुळचा पुण्याचा आहे. पुण्यात एमसी स्टॅन एका बस्तीमध्ये राहायचा. त्याच्या आयुष्यात अनेक वाद होते. एमसी स्टॅन याच्या गाण्यांमुळे देखील अनेक वाद रंगले. पण बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन याच्या चेन आणि ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं. सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन ८० हजार रुपयांचे बूट आणि दीड कोटी रुपयांची चेनची तुफान चर्चा रंगली. अनेकदा सलमान खान याने देखील एमसी स्टॅन याच्या लाईफ स्टाईलवर वक्तव्य केलं.

एमसी स्टॅन याच्या महागड्या कपड्यांवर आणि लाईफ स्टाईलवर सर्वांचं लक्ष असतं. मिळालेल्या माहितीनुसार एमसी स्टॅन याची एकुण संपत्ती जवळपास १६ कोटी रुपये आहे. एमसी स्टॅन त्याच्या रॅपर कॉन्सर्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. शिवाय एमसी स्टॅन नवीन गाणी देखील प्रदर्शित करत असतो.