Govt scheme : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत रायपनिंग चेंबर, शीतगृह व मल्चिंग पेपर साठी अनुदान योजना

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत रायपनिंग चेंबर, शीतगृह व मल्चिंग पेपरसाठी अनुदान योजना

योजनेचे स्वरूप

मोठ्या प्रमाणात उत्पादीत होणाऱ्या फलोत्पादन उत्पादनाचे बाजार नियंत्रण करणे, फलोत्पादन पिकांचे आयुष्य वाढवणे व मल्चिंग पेपरमुळे तणावर नियंत्रण करणे.

योजनेच्या अटी

◆वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समुह व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी ही योजना असेल.
◆७/१२, ८ अ च्या छायांकित प्रती.
◆आधार कार्डची छायांकित प्रत.
◆आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानांची छायांकित प्रत.
◆अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गाकरिता संवर्ग प्रमाणपत्र.

योजनेअंतर्गत लाभ

रायपनिंग चेंबरसाठी – कमाल ३०० मे.टन मर्यादेच्या १ लाख रुपये प्रकल्प खर्चास ३५ हजार रुपये अनुदान.

शीतगृह – १. एका उत्पादनासाठी कमाल मर्यादा ५ हजार मे. टन. प्रकल्प खर्च प्रति मे. टन ८ हजार रुपयास २ हजार ८०० रुपये अनुदान.
२.एकापेक्षा अधिक उत्पादनासाठी कमाल ५ हजार मे टन. प्रकल्प खर्च प्रति मे. टन १० हजार रुपयास ३ हजार ५०० रुपये अनुदान.

मल्चिंग- १ हेक्टर आकारमान असलेला प्रकल्प खर्च ३२ हजार  प्रति चौ. मी. साठी १६ हजार रुपये अनुदान.

अधिक माहितीसाठी विभागीय कृषि सहसंचालक,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.