केंद्रीय गृहमंत्र्यांनी उमेश कोल्हे निर्घृण खुनाचा तपास एनआयए कडे सोपवला

अमरावती –  अमरावतीच्या अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे (Amit Medical Director Umesh Kolhe) यांचे निर्घृण खून प्रकरण नुपूर शर्मा (Nupoor Sharma) वादग्रस्त प्रकरणाशी सबंधित आहे का, याचा तपास एनआयए ने करावा अशा आपण केलेल्या मागणी नुसार केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह (Amit Shah ) यांनी आज या प्रकरणाचा तपास एनआयए (NIA) कडे सोपवल्याबद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (BJP’s Maharashtra Pradesh spokesperson Shivrai Kulkarni) यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहे.

उमेश कोल्हे यांचा खुन नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या म्हणून झाला असल्याचे निष्पन्न आज अखेर अमरावती पोलिसांनी देखील काढले आहे. या प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढण्यासाठी एनआयए ची चमू (NIA team) अमरावतीत दाखल झाली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी प्रचंड पाठपुरावा करीत हा तपास एनआयए कडे सोपवावा अशी मागणी केली होती. शिवराय कुळकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे देखील पाठपुरावा केला होता. अखेर त्या मागणीला आज यश आले.

हा खून लुटमारीसाठी झाला असल्याचे निदर्शनास येत नाही. आरोपींनी लुटण्यासाठी चाकू मारला असता तर सोबतचे सामान, पैसे ते घेऊन पळाले असते. शिवाय, या खून प्रकरणात पकडलेले आरोपी यापूर्वी कुख्यात म्हणून प्रसिद्ध नाहीत. रुपये लुटण्यासाठी उमेश कोल्हे दिसताक्षणीच मोठा चायनिज चाकू त्यांच्या गळ्यात खुपसण्याऐवजी धाक दाखवून पैसे पळवण्याचा प्रयत्न झाला असता. हा खून नुपूर शर्मा यांच्या बाजूने समाज माध्यमांवर पोस्ट टाकल्या म्हणून झाला असल्याची जनचर्चा होती. हे आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का ? त्यांना धमक्या मिळाल्या होत्या का ? त्यांना या महिनाभरात कोणाकोणाचे व कुठून फोन आले ? ते विशिष्ट समाजाच्या लोकांचे होते का , अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता हा तपास एनआयए ने ( नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी )करावा, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी सातत्याने केली होती.

उमेश कोल्हे आणि त्यांना आलेले मेसेजेस, कॉल्स याचा सिडीआर (CDR) बारकाईने तपासला जावा. अमरावती संवेदनशील होऊ नये, पुन्हा अमरावतीतील सामाजिक सौहार्द खराब होऊ नये. यासाठी या प्रकरणाचा योग्य व कठोर तपास करून कारवाई व्हावी अशी विनंती शिवराय कुळकर्णी यांनी केली होती. आता एनआयए घटनेच्या मुळापर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.