Govt Scheem: अनुसूचित जातीच्या १०० विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिष्यवृत्ती देणारी योजना नेमकी काय आहे? 

योजनेचा उद्देश: विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे. स्पर्धात्मक युगामध्ये त्यांची जडणघडण व्हावी. याकरीता देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या अनसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

योजनेच्या प्रमुख अटी
• विद्यार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
• विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे
• या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा.

लाभाचे स्वरुप
• संस्थेने आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क
• क्रमिक पुस्तके व शैक्षणिक साहित्य यांच्या खर्चासाठी प्रतिवर्षी १० हजार रुपये

अधिक माहितीसाठी संपर्क: आयुक्त समाजकल्याण,समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-६