Sunetra Pawar | शरद पवारांनीच माझी सून म्हणून निवड केली; शरद पवारांच्या टीकेवर बोलताना सुनेत्रा पवार भावूक

Sunetra Pawar On Sharad Pawar |  बारामती लोकसभा मतदारसंघात पवार काका-पुतण्यामध्ये सुरू असणारा राजकीय संघर्ष आणखीन वाढताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये बोलत असताना “बारामतीकरांनी साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्यावं, बारामतीकर हे कायम पवार नावाच्या पाठीमागे उभे राहतात” असे विधान केलं होत. अजितदादांच्या या विधानाचा समाचार घेत ‘मूळचे पवार आणि बाहेरून आलेल्या पवारांमध्ये फरक आहे’ म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळे या मूळ तर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या विवाहानंतर पवार झाल्याचे अप्रत्यक्षरीत्या दर्शवण्याचा प्रयत्न केला.

पवारांचं हेच वक्तव्य ऐकून सुनेत्रा पवार चांगल्याच भावूक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पवारांनीच मला सून म्हणून निवडलं असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, घरातील सगळी मोठी माणसंच सुनेची निवड करतात. तशी माझी निवड शरद पवारांनीच केली होती. बारामतीत अटीतटीची लढत वगरे काही नाही.नातं नात्याच्या जागेवर आहे. राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. ही विचारांची लढाई आहे नात्याची नाही. बारामती तालुक्यातील सगळ्याच भागात फिरले. सगळ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. लोकांकडून मोठ्या प्रमाणात माझं स्वागत होत आहे. त्यामुळे मला सकारात्मक वाटत आहे. मला उमेदवारी मिळाली, ही बारामतीकरांची इच्छा होती. जनता हेच माजं कुटुंब आहे. जनता माझ्या पाठीशी उभी असल्याचं त्या म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल