नवीन कार घेणाऱ्यांसाठी होंडाच्या गाड्यांवर शानदार डिस्काऊंट

तुम्ही जर सेकंड हँड कार घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.तुम्ही होंडामधून तुमचे आवडीचे मॉडेल निवडून नवीन गाडी घेऊ शकता.यासाठी कंपनी देखील तुम्हाला एक वर्ष किंवा 20000 किलोमीटरची वॉरंटी मिळेल. 350 क्वालिटी चेक पोस्ट इंस्पेक्शनदेखील असेल.कंपनी आपल्या ग्राहकांना आपल्या सेकंड हँड कार प्लॅटफॉर्म होंडा ऑटो टेरेसच्या माध्यमातून या ऑफर देत आहे.होंडाकडून सर्टिफाईड कार खरेदी करण्याची ही एक संधी आहे.

होंडा कारमध्ये तुम्ही होंडा अमेझ, होंडा सिटी,होंडा जॅझ, हे मॉडेल्स खरेदी करू शकतात.याशिवाय इतर कार कंपन्या गाड्यांची देखील खरेदी करता येईल. या गाड्यांच्या किंमती शहरानुसार बदलतात. 2020 पर्यतच्या होंडा सिटी कार खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ऑटो टेरेस ही होंडा ची एक्सचेंज आणि प्री ओन्ड कार खरेदीसाठी वन स्टॉप सुविधा आहे.ऑटो टेरेसचे ध्येय त्यांच्या ग्राहकांना अत्यंत सोयीस्कर, पारदर्शक आणि आनंददायक सेकंड हँड कार खरेदी आणि विक्रीची सेवा प्रदान करणे होय.तुमच्याकडे सध्या असलेली कार नवीन होंडा कारमध्ये बदलण्याची सोय म्हणजे होंडा ऑटो टेरेस होय.