मतदार संघातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी तुलना करणाऱ्या गुलाबराव पाटलांनी मागितली माफी

मुंबई : सध्या राज्यभरात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरल्याने चांगलाच वादंग निर्माण झाला होता.

गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला.

गुलाबरावांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण तापलं. भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर अखेर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यानंतर आता पाटील भानावर आल्याचे दिसत आहे.

गुलाबराव पाटील दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ‘भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो’. काल दिवसभर झालेल्या टीकेनंतर पाटील यांनी अखेर धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये बोलताना आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागितली.