TREEI Foundation | TREEI फाउंडेशन आणि नेटक्रॅकर टेक्नॉलॉजीजचा वसाहतीतील महिलांमधील आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी पुढाकार

TREEI फाउंडेशनने (TREEI Foundation) व नेटक्रॅकर टेक्नॉलॉजीज च्या सहकार्याने , ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक परिवर्तनशील उपक्रम सुरू केला. ज्याचा उद्देश वसाहतीतील महिलांना भेडसावणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक समस्यांना तोंड देण्याच्या हा आहे. या उपक्रमामध्ये सहा महिन्यांच्या कालावधीत वसाहतीतील १००० महिलांना महुआ लाडू तसेच एकलव्याने शोधून काढलेला पौष्टिक आणि स्वदेशी खाद्यपदार्थ वाटपाचा समावेश आहे.

या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश दुर्लक्षित महिलांमध्ये अशक्तपणा, जीवनसत्वाची कमतरता आणि असंसर्गजन्य रोग (NCDs) यासारख्या प्रचलित आरोग्य समस्यांशी लढा देणे हा आहे. एकूण आरोग्य सुधारण्यासाठी पोषणाचे महत्त्व ओळखून, TREEI फाउंडेशन आणि नेटक्रॅकर टेक्नॉलॉजीज यांनी या महिलांच्या जीवनात महत्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी एकत्र आले आहेत.

या प्रसंगी बोलताना TREEI फाऊंडेशनचे (TREEI Foundation) संस्थापक तन्वीर इनामदार म्हणाले की, ” वसाहतीत राहणाऱ्या महिलांचे आरोग्य चांगले करण्याच्या आमच्या वचनबद्धतेसाठी हे आमचे एक छोटे पाऊल आहे. आम्ही या महिलांना चांगले जीवन जगण्यासाठी सक्रियपणे मदत करत आहोत आणि त्यांचे पौष्टिक दोष कमी करण्यात प्रयत्नशील आहोत.”

पुढे ते पुढे म्हणाले, “हे आमचे पाऊल “सर्वांसाठी पोषण” या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ची एक सुरुवात आहे. तसेच आरोग्य असमानता दूर करण्यासाठी TREEI फाउंडेशन आणि नेटक्रॅकर टेक्नॉलॉजीज वचनबद्ध आहे.”

महुआ लाडूंचे वितरण आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू झाले आणि पुढील सहा महिने आठवड्यातून तीन वेळा सुरू राहील. ५ एप्रिल रोजी, TREEI फाउंडेशनने व नेटक्रॅकर टेक्नॉलॉजीज च्या सहकार्याने, पुण्यातील १० वसाहतींमध्ये, १००० महिला लाभार्थ्यांना आणि १००० किलोग्रॅम महुआ लाडूंचे वाटप करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा