Gunaratna sadavarte : मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात याचिका, आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी

Maratha Reservation – मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जमाव हिंसक होऊन जाळपोळ करत असल्याचं समोर येत आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राज्यभरातील शेकडो एसटी बसची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. त्यात एसटीचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दुसरीकडे या जाळपोळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केले. तसेच आंदोलनाला गालबोट लागेल अशी कृती कुणी करू नये, असं आवाहन केलं.

दरम्यान, आता याच आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte) यांनी हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून सदावर्ते विरुद्ध मराठा समाज असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज गुणरत्न सदावर्तेंविरोधात आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झालीये.

महत्त्वाच्या बातम्या-

जावई केएल राहुल नव्हे तर सुनील शेट्टीला आवडतो ‘हा’ खेळाडू, पाहा कोण आहे तो?

अभिनेता रजनीकांत यांचा डाय हार्ड फॅन, उभारलं भव्यदिव्य मंदिर; होतेय सर्वत्र चर्चा

भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता, शोधासाठी पोलिसांची 6 पथके रवाना