Ajit Pawar | अजित पवारांना गुर्मी, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांच्यातील तेढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोनवेळा भेट घेऊन विजय शिवतारेंना (Vijay Shivatare) समजावण्याचा प्रयत्न केला असतानाही शिवतारे त्यांच्या भूमिकेवर कायम आहेत. अजित पवार (Ajit Pawar)हे कसलीही माणुसकी नसलेले व्यक्ती आहेत, त्यांना प्रचंड गुर्मी आहे असं सांगत या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य असल्याचं वक्तव्य विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केलंय.

माझं हे बंड नाही, पवारांच्या विरोधात बारामती मतदारसंघात साडे पाच लाख मतदार आहेत. पवारांचे समर्थन करणारे मतदार दोन भागात विभागतील, तर मग विरोध करणाऱ्या मतदारांनी काय करायचं? त्यामुळे पवारांना नाकारणाऱ्या मतदारांसाठी मी निवडणूक लढतोय, अशी स्पष्टोक्ती विजय शिवतारे यांनी दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

अजित पवार युतीमध्ये आल्यानंतर मी स्वतः त्यांना भेटायला गेलो, त्यांचं स्वागत केंल. पण त्यांची गुर्मी कधी जाणार नाही. माझ्याकडून हे काम करून घेण्यासाठीच मला ही संधी मिळत आहे. 2014 साली महादेव जानकरांच्या ठिकाणी मी उभा असतो तर त्याचवेळी मी निवडून आलो असतो. बारामती कुणाचा सातबारा नाही, घराणेशाहीच्या विरोधात हा लढा आहे. या निवडणुकीकडे मी वैयक्तिक वैर म्हणून लढत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत चारशे कार्यक्रमांचे आयोजन, ॲड. आशिष शेलार यांची माहिती

Prakash Ambedkar | आमचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरुन विश्वास उडाला, प्रकाश आंबेडकरांचे थेट काँग्रेस अध्यक्षांना पत्र

Praniti Shinde | जो पक्ष मतांचं विभाजन करतो, तो भाजपाला मदत करतो; प्रणिती शिंदे यांच्याकडून वंचितची अप्रत्यक्ष धुलाई