हार्दिक पंड्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी किती वेळ लागेल? महत्त्वाची अपडेट आली समोर

Hardik Pandya Injury Update: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने (Team India) आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंतचे पाचही सामने जिंकले आहेत. भारतीय संघ रविवारी लखनौच्या एकना स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध (INDvsENG) आपला पुढचा सामना खेळणार आहे.

टीम इंडिया आपला विजयरथ अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि स्पर्धेत सलग सहावा विजय नोंदवेल. भारतीय संघाचा पुढील सामना निःसंशयपणे महत्त्वाचा आहे. यातच आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे.  टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही.

वृत्तानुसार, 2 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यालाही हार्दिक मुकणार आहे. मात्र तो दोन ते तीन दिवसांत पुन्हा सराव सुरू करू शकतो. जी चांगली बातमी आहे. सध्या टीम इंडिया संघात त्याच्यासाठी कोणताही बदली किंवा कव्हर शोधत नाही.

महत्वाच्या बातम्या-

मी पुन्हा येईन… फडणवीस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? भाजपाकडून संकेत

सणासुदीत कांद्याने केला वांदा, भाव गगनाला भिडले

मंदिर वही बनायेंगे : या दिवशी रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार