बीसीसीआयने अचानक वेळापत्रक जाहीर केले, डिसेंबर-जानेवारीमध्ये ‘हे’ संघ भारत दौऱ्यावर येतील

Team India Schedule: आशियाई क्रीडा 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्ध मालिका खेळण्यासाठी घरच्या भूमीवर मैदानात उतरेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दोन्ही मालिकांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिला अ संघ आणि इंग्लंड महिला अ संघ यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. भारतीय महिला संघ प्रथम इंग्लंड विरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे, त्यातील पहिला सामना 6 डिसेंबर, दुसरा 9 डिसेंबर आणि तिसरा सामना 10 डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. ही मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामनाही खेळवला जाणार आहे. हा सामना 14 ते 17 डिसेंबर दरम्यान मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.

इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर लगेचच भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात दुसरी मालिका खेळायची आहे. यामध्ये सर्वप्रथम 21 ते 24 डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्याचे सामने 28 डिसेंबर, 30 डिसेंबर आणि 2 जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. ज्यामध्ये सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होतील. उभय संघांमधील तीन सामन्यांची टी-२० मालिका ५ जानेवारीपासून सुरू होणार असून तिचा दुसरा सामना ७ जानेवारीला तर शेवटचा सामना ९ जानेवारीला होणार आहे. या T20 मालिकेतील सर्व सामने डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जातील.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला नाही, समाजासाठी…”, सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या मंगेश साबळेंच्या आईची विनंती

‘गाथा नवनाथांची’ मालिकेत आरूष बेडेकर दिसणार बाल नागनाथांच्या भूमिकेत!

मोठी बातमी ! ड्रग्ज माफिया Lalit Patil प्रकरणात महिला पोलीस अधिकारी निलंबित