किशोरावस्था की ३० नंतर, मूल जन्माला घालण्याचे योग्य वय कोणते? जाणून घ्या विज्ञान काय सांगते

All About Age and Fertility: अनेकदा लोक म्हणतात की मुला-मुलींनी लहान वयातच लग्न केले पाहिजे, जेणेकरून त्यांना मुले होण्यात अडचणी येऊ नयेत. काही लोक 20 वर्षे हे मूल होण्यासाठी योग्य वय मानतात, तर बरेच लोक 30 नंतर पालक बनणे चांगले मानतात. लग्न आणि मुलं होण्यासाठीचे योग्य वय यावरुन बराच काळापासून वाद सुरू आहे. त्याबद्दल प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. आता प्रश्न पडतो की वयाचा आणि मूल होण्याचा खरोखरच सखोल संबंध आहे का? 30-40 वर्षांवरील लोक पालक होऊ शकत नाहीत का? याविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया… (Ideal Time To Become Parents)

मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, मूल होण्यासाठी कोणतेही परिपूर्ण वय नसते, जे प्रत्येकासाठी समान असते. हे वय प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. स्त्रियांना सहसा किशोरावस्थेपासून (Teenage) मेनोपॉजपर्यंत (Menopause) मुले होऊ शकतात, तर पुरुष 60 किंवा 70 वर्षांपर्यंत वडील बनू शकतात. मात्र या सर्व गोष्टी लोकांच्या आरोग्यावर अवलंबून असतात. काही महिला आणि पुरुषांची प्रजनन क्षमता दीर्घकाळ चांगली असते, तर काहींची प्रजनन क्षमता कमी वयातच कमी होते. याची अनेक कारणे असू शकतात.

याबद्दल विज्ञान काय म्हणते?
विज्ञानानुसार, कोणताही मुलगा किंवा मुलगी किशोरवयात प्रवेश करतात तेव्हा त्यांची प्रजनन क्षमता सुरू होते. साधारणपणे, पुरुष आणि महिलांमध्ये सर्वाधिक प्रजनन क्षमता 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असते. अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनच्या मते, 30 वर्षांच्या वयानंतर महिलांमध्ये प्रजनन क्षमता कमी होते. तर 35 ते 45 वयोगटातील स्त्रियांची प्रजनन क्षमता लक्षणीयरीत्या कमी होते. 30 वर्षांच्या निरोगी स्त्रीला दर महिन्याला गर्भधारणेची 20% शक्यता असते. वयाच्या 40 नंतर, हा आकडा 5% पेक्षा कमी होतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जरी मेनोपॉजचे वय सुमारे 50 वर्षे आहे आणि स्त्रिया मेनोपॉजपूर्वी गर्भवती होऊ शकतात.

पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या प्रजननक्षमतेसाठी वयाची मर्यादा नाही. परंतु वयानुसार, त्यांच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होते. 60 वर्षांनंतर पुरुषांचा पिता बनण्याचा मार्ग खूप कठीण असू शकतो.

लहान वयातही अनेक समस्या उद्भवू शकतात
वय हा एकमेव घटक नाही जो स्त्रीच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करतो. अमेरिकेतील सुमारे 12-13% जोडप्यांना त्यांच्या वयाची पर्वा न करता गरोदर राहण्यात समस्या येतात. वैयक्तिक आरोग्य प्रत्येक वयात मुले होण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि एंडोमेट्रिओसिस यांसारख्या वैद्यकीय परिस्थितींचा लहान वयातच प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मानसशास्त्रीय घटक आणि आर्थिक परिस्थितीमुळे काही प्रमाणात लोक प्रभावित होतात.

(टीप- हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्विकारण्यापूर्वी वैद्यकिय सल्ला घ्यावा. आझाद मराठी याची पुष्टी करत नाही.)