सर्व धर्मांना एकत्र घेऊन समतेचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पुढे नेत आहे – धनंजय मुंडे

Dhananjay Munde: छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा विचार या मातीतून रुजवला त्या मातीतून सर्व धर्मांना एकत्र घेऊन समतेचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुढे नेत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या (Sharad Pawar) विचारांची ही उत्तरदायित्वाची सभा आहे.

महाराष्ट्राच्या विकासाशिवाय अजित पवारांनी (Ajit Pawar) काही पाहिले नाही त्यामुळेच आज महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला लोकनेते केले आहे अशा शब्दात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केले.

हे कोल्हापूर आहे… ते पायताण कसे बनवायचे… ते पायात कसे घालायचे आणि योग्य वेळी हातात घेऊन कसे दाखवायचे कसे हे चांगलेच माहीत आहे असा उपरोधिक टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

कोल्हापूरच्या पैलवानाला आव्हान देताय का? … परंतु त्या पैलवानाने प्रेमाने मिठी मारली तर समोरच्याच्या बरगड्या तरी राहतील का? असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केल्यावर जनतेतून जोरदार घोषणाबाजी झाली.

एकीकडे लोकशाहीची ग्वाही द्यायची दुसरीकडे स्वाभिमानाची ग्वाही द्यायची… आदरणीय साहेब आम्ही तुमच्यासाठी जीव दिला असता परंतु काहीजणांचा मतदारसंघ सांभाळण्यासाठी राजकारण केले गेले असेही धनंजय मुंडे म्हणाले.

अल्पसंख्याक समाजात जन्माला येऊन छत्रपती शाहू महाराजांचा वारसा काय असतो… श्रीरामाचे संगमरवरी मंदीर बांधले त्या माणसाला बदनाम केले जात आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

आज या विराट सभेने महालक्ष्मीचेच दर्शन आज तुमच्या रुपाने दाखवले आहे. हा आशिर्वाद दादांच्या पाठीशी उभा करा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

या ऐतिहासिक तपोवन मैदानावर ही विराट सभा होत आहे. पुण्यात निघालेली अशी ऐतिहासिक मिरवणूक मी कधी माझ्या जीवनात कुठल्याच नेत्याची पाहिली नाही ती आज अजितदादांची पाहिली असेही धनंजय मुंडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; अवघ्या १४ महिन्यात १३,००० हुन अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची मदत वितरित