उरलेल्या भातापासून १० मिनिटात बनवा Chinese Fried Rice, येथे आहे रेसिपी

Chinese Fried Rice Recipe: फ्राइड राईस हे एक आशियाई खाद्यपदार्थ आहे जे तव्यात किंवा पॅनमध्ये फ्राय करुन अगदी सहजपणे तयार केले जाते. ही पक्वान तयार करण्यासाठी फक्त 10 मिनिटे लागतात. ही रेसिपी तुम्ही तुमच्या आवडत्या डिशसोबत खाऊ शकता. फ्राईड राईस बनवण्याची पद्धत पाहूया… (How to make Chinese Fried Rice)

सर्व प्रथम, एक कढई घ्या, त्यात तेल घाला, ते गरम करा आणि त्यात किसलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा घाला आणि छान लाल होईपर्यंत परता.

कांदा चांगला शिजल्यावर त्यात चिरलेली गाजर आणि बीन्स घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. आता त्यात मीठ, मिरची पावडर, चिली फ्लेक्स, मसाला, केचप आणि व्हिनेगर घालून सर्व साहित्य चांगले मिसळा.

आता तयार मसाल्यामध्ये शिजलेला भात घाला, नीट मिक्स करा आणि झाकण बंद करा आणि एक किंवा 2 मिनिटे शिजू द्या जेणेकरून मसाल्यांची चव भातामध्ये चांगली जाईल. गरम फ्राइड राईस तयार आहे, त्याला कोथिंबीरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा