‘अशोक सराफ यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्याच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव’

Ashok Saraf :- ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील अशोक सराफ याचे कौतुक केले .

ते म्हणाले, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार कलाक्षेत्रातील प्रदीर्घ देदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयानं, विनोदी भूमिकांनी त्यांनी रसिकांना मनमुराद हससवलं. मराठीसह हिन्दी कलाक्षेत्रं समृद्ध केलं.

मराठीतील ‘सुपरस्टार’ अभिनेता म्हणून म्हणून नवोदित कलावंतांना प्रेरणा दिली. मार्गदर्शन केलं. वैयक्तिक जीवनातही आदर्श नैतिक मूल्यांची जपणूक केली. त्यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार एका महान कलावंताचा गौरव आहे. कोट्यवधी महाराष्ट्रवासियांनी एका अजातशत्रू व्यक्तिमत्वांवर केलेल्या प्रेमाचं हे प्रतिक आहे,” अशा शब्दात अजित पवार यांनी ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

देवाभाऊंची कमाल! एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार; 83,900 लोकांना मिळणार रोजगार

ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल