दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात ! आधुनिक मशीन बसवण्याची नागरिकांची मागणी

गंगाखेड / विनायक आंधळे – मागील काही दिवसापासून जुन्या गंगाखेडमधील (Gangakhed) परिसरात दूषित पाणीपुरवठा (Contaminated water supply) होत आहे. या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गढूळ पाणीपुरवठा (Dirty water supply) होत असल्यामुळे नागरिकांना मिनरल वॉटर (जार) (Mineral water) चे पाणी पैसे देऊन घ्यावे लागत आहे. गढूळ पाण्यामुळे शहरातील साथीच्या रोगांचे प्रमाण वाढलेले दिसते. थंडी, ताप, जुलाबाची लागण अनेकांना पाहायला मिळत आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये रुग्ण दिसत आहेत.

शहरातील नगरपालिका (Gangakhed Municipality)  हद्दीतील जुन्या गावठान भागामध्ये ज्या पाण्याच्या टाकीतुन पाणी पुरवठा होतो त्या टाकी मध्ये एक इंग्रजांच्या काळातील पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा लावलेली असुन ही जवळपास १०० वर्षे जुनी असुन आता ती कालबाह्य झालेली आहे. परंतु, अजही त्याच पध्दतीने पाणी स्वच्छ करून जुन्या गावठाण भागात त्याचा पुरवठा केला जात आहे.

जे पाणी नागरपालिके मार्फत पुरवठा केले जात आहे ते पाणी अतिशय घाण स्वरूपाचे असुन पिण्यायोग्य नाही. या सर्व अडचणींचा आढावा घेऊन पाणी स्वच्छ करण्याची आधुनिक मशीन किंवा यंत्रणा आणून बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर गोरे (Sagar Gore) यांनी ५ जुलै २०२२ रोजी निवेदनाद्वारे मा.मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभाग अधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून अर्ज केला आहे. यावर, नागेश डामरे (जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस परभणी) व अतुल सुरवसे (Nagesh Damre And Atul Surwase) यांच्या साह्य होत्या.

परंतु, १५ दिवस उलटूनसुद्धा प्रशासनाकडून याची काहीच दाखल घेतली जात नाहीये. या प्रकारामुळे परिसरातील लोकांमध्ये नगरपालिकेच्या विरोधात रोषाच वातावरण तयार झाले आहे. जर, असाच दूषित पाणीपुरवठा चालू राहिला आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका (A threat to the health of citizens) निर्माण झाला तर, या गोष्टीला जबाबदार कोण असणार असं या भागातील नागरिक आता विचारत आहेत.