हिवाळ्यात लहान मुलांना अवश्य खाऊ घाला ‘या’ ५ भाज्या, आयुष्यभर लागणार नाही चष्मा!

Health Tips: आजकाल लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. सातत्याने टीव्हीपुढे बसून राहणे, मोबाईल पाहाणे, व्हिडिओ गेम्स खेळणे, इत्यादी कारणांमुळे लहान वयातच मुला-मुलींना चष्मा लागत आहे. याबरोबरच खाण्या-पिण्यातून त्यांना आवश्यक घटक मिळत नसल्यानेही लहान मुलांचे डोळे कमजोर होतात. त्यामुळे सर्वप्रथम, आपल्या मुलांचा आहार निश्चित करा.

आहाराबद्दल बोलायचे झाले तर, डोळ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिरव्या भाज्यांचे सेवन. वास्तविक हा हिरव्या भाज्यांचा हंगाम आहे आणि या भाज्या खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास आणि दृष्टी वाढण्यास मदत होते. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या सेवनाने डोळे निरोगी राहण्यास मदत होते.

जॉइन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

1. चाकवतीची भाजी
चाकवत ही हिरवी भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये पॉलीफेनॉल आणि काही अँटिऑक्सिडंट असतात जे दृष्टी वाढवण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासोबतच हे कॉर्नियाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

2. शिमला मिरची
शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे दृष्टी वाढवण्यास मदत करते. याशिवाय त्याच्या हिरव्या रंगातील अँटिऑक्सिडंट्स त्याच्या पेशींना निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच शिमिला मिरचीची कोशिंबीर किंवा भाजी बनवा आणि मुलांना खायला द्या.

3. गाजर
गाजरात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, जे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. विशेष म्हणजे त्यात कॅरोटीनॉइड्स आणि ल्युटीन देखील भरपूर प्रमाणात असतात. जे तुमचे स्नायू मजबूत करतात आणि मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. म्हणूनच हिवाळ्यात गाजराची कोशिंबीर किंवा सूप बनवून मुलांना खायला द्या.

4. पालक
पालकामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. मुलांना पालक खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही पालक सूप, पालक डाळ आणि पालक पराठा बनवून मुलांना खाऊ घालू शकता. हे त्यांच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

5. रताळे
थंडीच्या मोसमात बाजारात रताळ्याची भरमार असते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि ल्युटीन असते. त्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात या भाज्या मुलांना नक्कीच खायला द्या.