आता मनसोक्त पादा! खोटे वाटेल, पण पाद सोडल्याने हृदयविकार, कर्करोग टाळता येतात; Fartingचे फायदे

जीवनात आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. यापैकी एक म्हणजे पाद येणे (Farting). जेव्हा चारचौघे एकत्र बसलेले असतात आणि कुठूनतरी दुर्गंधी येत असते, तेव्हा सगळे एकमेकांवर संशय घेऊ लागतात की कोणीतरी पादलं आहे. परंतु सहसा कोणीही स्वत:हून आपण आपलं पोट बिघडलं आहे आणि आपणच दुर्गंधी सोडली आहे, हे मान्य करत नाही. याउलट काही लोकांचे वर्तन असे असते की जणू काही त्यांच्या पोटात गॅसच निर्माण होत नाही. कारण पादणे तेही सर्वांसमोर, ही प्रत्येकाला लाजिरवाणी गोष्ट वाटते.

याच कारणामुळे असे काही लोक असतात, जे हळूहळू गॅस पास करतात. तर असे काही लोक असतात, जे हा लाजिरवाणा प्रकार टाळण्यासाठी फार काळ पादला धरून ठेवतात. पण गॅस जबरदस्तीने पोटात धरुन ठेवू नये. कारण त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात. याउलट, पादण्याचे अनेक फायदे आहेत.

पाद सोडण्याचे फायदे कोणते आहेत? (Farting Benefits)
1. पोटाची जळजळ कमी करते.
2. यामुळे पोट हलके होते.
3.पादचा वास घेतल्याने कर्करोग, पेशींचे नुकसान किंवा हृदयविकाराचा झटका असे आजार टाळता येतात.
4. पाद जंतू प्रसारित करू शकते.
5. पाद हे दर्शविते की तुम्ही योग्य आहाराचे पालन करत नाहीय.
6. पादल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो.

(टीप: या लेखात नमूद केलेल्या गोष्टी, पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या. आझाद मराठी त्याची पुष्टी करत नाही)