लोकप्रतिनिधी सोडून नोकरशाहीच्या हाती महाराष्ट्र देणे योग्य नाही; कॉंग्रेसची सरकारवर टीका 

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) (Shivsena) आणि भाजप (BJP) सरकारचा या आठवड्यात होणारा मंत्रिमंडळ विस्तार स्थगित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार टांगणीला लागल्याने आता मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मंत्र्यांअभावी अनेक विभागांच्या कामांवर परिणाम होत असून, त्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत.

मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांचे सर्व अधिकार मंत्र्यांकडे आहेत, अनेक आदेश ज्यांची तातडीने गरज आहे. गेल्या महिनाभरापासून गृह, महसूल आणि शहरी विकास मंत्रालयात अनेक अपील प्रलंबित आहेत. त्याचवेळी नवीन सरकार स्थापन होऊन 36 दिवसांहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. मंत्रिमंडळ (Cabinet) स्थापन न झाल्याने त्याचा परिणाम आता विभागांवर होत आहे. त्यामुळे मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी जारी केले आहेत.

दरम्यान, यावरून आता कॉंग्रेसने शिंदे सरकारवर टीका केली आहे. कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले, आदरणीय शंकरराव चव्हाण (Shankarao Chavan) साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लोकाभिमुख काराभारासाठी सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय केले. लोकशाही मध्ये सरकार लोकप्रतिनिधींनी चालवणे अपेक्षित आहे अधिका-यांनी नाही. लोकप्रतिनिधी सोडून नोकरशाहीच्या हाती महाराष्ट्र देणे योग्य नाही.