‘पेंग्विन आणल्यास टिंगलटवाळी आणि चित्ते आणल्यावर मात्र सर्व माध्यमांतून ढोल पिटणे ही विसंगती कोणाला खटकत नाही?’

मुंबई – तब्बल ७ दशकांनंतर भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचं मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आज सकाळीच आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना १० किलोमीटर पसरलेल्या अभयारण्यात सोडण्यात आले. संपूर्ण देशभरातून या घटनेबाबत चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला पत्रकार हेमंत देसाई यांनी मात्र या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ‘इंडिया राइट्स हिस्टरी वुइथ अरायव्हल ऑफ चीताज्’ अशा अर्धा अर्धा किंवा पानपानभर जाहिराती आज देशभरातील वर्तमानपत्रांत झळकल्या आहेत. ‘हे सर्व द्रष्ट्या अशा मोदींच्या नेतृत्वामुळेच’ असा उल्लेखही जाहिरातीमध्ये आहे.

गेली आठ वर्षे भारतात पहाट, सकाळ, दुपार संध्याकाळ सर्व मोदींमुळेच होत आहे, हे मान्य आहे. मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा! पण मग राणीच्या बागेत पेंग्विन आणल्यास टिंगलटवाळी व टीका आणि चित्ते आणल्यावर मात्र सर्व माध्यमांतून ढोल पिटणे, ही विसंगती कोणाला खटकत नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.