Manikrao Gavit : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं निधन

धुळे – तब्बल नऊ वेळा खासदारकी भूषवलेले तथा देशाचे माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे आज (१७ सप्टेंबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना सोमवारी (12 सप्टेंबर) उपचारांसाठी नाशिक (Nashik) येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देशाचे माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे नाशिकमध्ये उपचारादरम्यानक एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते नंदूरबारमधून तब्बल ९ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या नवापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. गावित यांचे पुत्र तसेच मुलगी राजकारणात सक्रिय आहेत. मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार आहेत. तर पुत्र भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.

माणिकराव गावित यांच्या निधनामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी म्हणजेच उद्या सकाळी त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.