Himachal Hotels: मनाली आणि बारोटच्या ‘या’ हॉटेल्समध्ये पर्यटकांना राहण्याची व जेवणाची मिळतेय मोफत सोय

हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने कहर केला आहे. अशा परिस्थितीत मनाली (Manali) आणि बारोट (Barot) येथील अनेक हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसने बाधित पर्यटकांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. हॉटेल मालकांनी पर्यटकांची राहण्याची व जेवणाची सोय मोफत केली आहे. ‘अतिथी देवो भवो’चे हे एक अद्वितीय उदाहरण आहे.

रंगारी, मनाली येथील बियास व्हॅली आणि बियास रेसिडेन्सी हॉटेलने गरजू लोकांना मोफत मदत देऊ केली आहे. मनालीतील एका हॉटेलने ट्विट केले की हॉटेलमध्ये राहण्यासाठी कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत आणि सर्व मदत केली जाईल. ओलोनेल्स बारोट हाईलँड रिट्रीट, जे मंडीपासून 40 किमी अंतरावर आहे. मनाली आणि जवळपासच्या भागात अडकलेल्या पर्यटकांसाठी हॉटेलने मुक्काम मोफत केला आहे. त्यांचे लोकेशन आणि मोबाईल नंबर शेअर करत हॉटेल्सनी ट्विट केले की, आमचे जेवण आणि जागा गरजूंसोबत शेअर करणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.