आधी धंगेकरांना भाजपची ऑफर; आता काकडे म्हणतात, मी फडणवीसांचा चेला.. में ही काफी हूँ

Pune News : काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक (Pune Lok Sabha Election) लढवण्यासाठी इच्छुक आहेत. नुकताच त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्यासमोर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जरी उमेदवार म्हणून आले तरी त्यांचा पराभव करणार असल्याचं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलं होतं. यावर आता भाजप नेते संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी उत्तर दिला आहे.

भाजप नेते संजय काकडे हे पूर्वीपासून रवींद्र धंगेकर यांना भाजपमध्ये घेण्यासाठी आग्रही राहिले आहेत. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणूक मध्ये धंगेकर यांचा भाजप प्रवेश घडवून त्यांना भाजपचा नगरसेवक बनवण्याचा चंग संजय काकडे यांनी बांधला होता. त्यानंतर वारंवार धंगेकर हे भाजपात यावे यासाठी संजय काकडे आग्रही असल्याचे बोलले जात होतं. अलीकडेच त्यांनी धांगेकर यांना भाजपाचे ऑफर दिली होती. धांगेकर यांच्या भाजप प्रवेशासाठी दुवा होणाऱ्या संजय काकडे यांनी आता धांगेकर विरोधात दंड थोपटले आहेत.

प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना काकडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून मी इच्छुक आहे. माझ्यासह प्रामुख्याने चार इतर भाजपचे नेते देखील इच्छुक आहेत. एखाद्या पक्षामध्ये जास्त इच्छुक असणे हे त्या पक्षासाठी जमेची बाजू असते. मात्र भाजपाकडून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या असली तरी पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं आम्ही सर्व एकदिलाने काम करून जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून आणण्याचं प्रयत्न करणार आहोत.

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना काकडे म्हणाले, धांगेकर हे माझे चांगले मित्र आहेत. व्यक्तिमत्व देखील चांगला आहे. मात्र ही निवडणूक विधानसभेचे नसून लोकसभेचे आहे. धंदेकरांचा काम कसबा मतदारसंघ पुरते मर्यादित आहे. आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप म्हणून आमच्या काही चुका झाल्या आणि पराभव स्वीकाराव लागला. मात्र हा पराभव धंगेकर विरुद्ध रासने असा होता तो पराभव भाजपाचा नव्हता.

रवींद्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीस बद्दल बोलणं चुकीचा असून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची येण्याची गरज नाही. आमच्या सारखे देवेंद्र फडणवीस यांचे चेले त्यांच्या साठी खूप असल्याचे काकडे म्हणले आहेत.

एकावेळी भाजप स्थानिक नेत्यांचा विरोध पत्करून धांगेकर यांना भाजप मध्ये घेण्यासाठी आग्रही असणाऱ्या काकडे यांनी विरोधात भूमिका घेतल्याने सर्वांच्या भुवया उचवल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार