संख्याबळ नसताना भाजप कशी जिंकणार विधान परिषदेची निवडणूक?

मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council elections) दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena, Bharatiya Janata Party, Congress and NCP) असे चारही पक्ष आपआपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीनं पार पडणार आहे.

भाजपच्या पक्षीय संख्याबळाचा विचार करता भाजपचे 4 उमेदवार कटाकटी निवडूण येतील. पाचव्या जागेसाठी भाजपचे एकही मत शिल्लक नसताना भाजप हा चमत्कार (Miracles) कसा घडवून आणणार? कॉंग्रेसच्या भाई जगताप (Bhai Jagtap) समोर भाजपनं तुल्यबळ उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) दिला आहे. अशावेळी भाजपची सर्व भिस्त आहे ती अपक्ष आमदार आणि मविआकडून (MVA) फुटणाऱ्या मतांवर.

छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहे. या सर्वांनी मतदान भाजपला केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल. मात्र असं होणार नाही. मविआच्या संपर्कात सुद्धा यातले काही आमदार आहेत. भाजप पुन्हा तांत्रिक डावपेच खेळून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार का याचं उत्तर आज मिळणार आहे.