49व्या वर्षी हृतिक रोशन चढणार बोहल्यावर? 12 वर्षांनी लहान असलेल्या सबासोबत घेणार सात फेरे

बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ हृतिक रोशन (Hritik Roshan) आज त्याचा ४९ वा वाढदिवस (Hritik Roshan Birthday) साजरा करत आहे. अभिनेता हृतिक वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात त्याच्या सर्वोत्तम टप्प्यात आहे. लवकरच हृतिक दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याच वेळी, आता बातम्या येत आहेत की हृतिक यावर्षी त्याची गर्लफ्रेंड (Hritik Roshan Girlfriend) सबा आझादशी (Saba Azad) लग्न करण्याच्या तयारीत आहे. दोघांमध्ये जवळपास १२ वर्षांचे अंतर आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा एकत्र दिसले आहेत. कधी पार्टी तर कधी दोघेही सुट्टीचा आनंद लुटताना दिसतात. चाहत्यांनाही दोघांची जोडी आवडते आणि अशा परिस्थितीत आता हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात (Hritik Roshan Marriage) अडकणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. हृतिक रोशनचे कुटुंबही सबा आणि त्यांच्या नात्याबद्दल खूप आनंदी आहे. इतकंच नाही तर हृतिकची पूर्व पत्नी सुजैन खान आणि मुलगाही सबासोबत चांगले संबंध शेअर करतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, हृतिक आणि सबा दोघेही त्यांच्या लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत, पण त्यात कोणतीही घाई नाही. या वर्षाच्या अखेरीस परिस्थिती चांगली होईल आणि दोघेही लग्नाची योजना आखतील. सध्या दोघेही त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना लग्नाच्या वेळी कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. तसेच लग्नानंतर ते सुट्टीवर जाणार आहे. लग्न अजिबात भव्य होणार नाही आणि सुजैन खानसह फक्त त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

कोण आहे सबा आझाद?
सबा आझादचं खरं नाव सबा सिंग गरेवाल आहे. भारतातील प्रसिद्ध नाट्य कलाकार आणि कम्युनिस्ट नाटककार सफदर हाश्मी यांची ती भाची आहे. सबाने तिच्या दिवंगत काकाच्या दिल्लीतील जन नाट्यमंच या थिएटर ग्रुपमधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे तिने हबीब तन्वीर आणि एम.के. रैना यांच्यासोबत काम केलं. इशान नायर दिग्दर्शित ‘गुरूर’ हा तिचा पहिला चित्रपट होता.