धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो चित्रपट सुपर डुपर चालेल – करुणा शर्मा  

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गंभीर आरोप केल्याने करुणा शर्मा (Karuna Sharma) या गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आल्या आहेत. करुणा शर्मा यांनी नुकताच राजकारणात प्रवेशकेला असून आता त्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान, पंढरपुरात बोलताना करुणा शर्मा यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केलंय. ‘राजकारण कसं चालतं हे मी गेली 25 वर्षापासून पाहत आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल’, असं वक्तव्य करुणा शर्मा यांनी केलंय. आमच्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहे? आणि येथील नेते कसे आहेत? करुणा मुंडेवर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक रांगते उभा आहेत, अशी टिप्पणी करुणा शर्मा यांनी केली आहे.

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वाद मागील काही दिवसात प्रकर्षाने पुढे आलाय. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपण परळीतून निवडणूक लढवणार असल्याचंही करुणा शर्मा यांनी यापूर्वी म्हटलंय. कोल्हापूर येथून पोटनिवडणूक लढवणार आहे. त्यामुळे विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला असून 2024 ला परळीतून निवडणूक लढवणार आहे.असं त्यांनी यावेळी म्हटलंय.