दुर्दैवी! ‘या’ क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीला लागले दुखापतीचे ग्रहण, अकाली संपले करिअर

क्रिकेटच्या (Cricket) इतिहासात आतापर्यंत असे अनेक खेळाडू घडले आहेत, ज्यांनी आपल्या कौशल्याने आणि कामगिरीने जगभरात नाव कमावले आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रिकी पाँटिंग, वीरेंद्र सेहवाग, स्टीव्ह वॉ, कपिल देव, इम्रान खान, वसीम अक्रम, ब्रायन लारा, कोर्टनी वॉल्श, व्हिव्ह रिचर्ड्स, अशी कधीच न संपणारी यादी आहे.

क्रिकेटच्या इतिहासात जेव्हा जेव्हा या क्रिकेटपटूंचे नाव घेतले जाते, तेव्हा ते मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या देशासाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. तथापि, असे काही दुर्दैवी क्रिकेटपटू (Unlucky Cricketers) होते, जे खूप प्रतिभावान होते परंतु दुखापतीमुळे (Injury) त्यांची कारकीर्द अकाली संपली. या यादीत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची नावे आहेत. आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासातील अशा 5 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे करिअर दुखापतीमुळे खूप लवकर संपले आणि नंतर ते पुढे खेळू शकले नाहीत. (Cricketers Career Ended Due To Injury)

1.फिल ह्यूज
एकाच कसोटी सामन्यात दोन शतके झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणजे फिल ह्यूज (Phil Hughes). वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला होता. फिल ह्यूज 25 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर जबरदस्त फलंदाजी करत होता. तो 63 धावांवर असताना एक बाउन्सर चेंडू त्याच्या डोक्याला लागला. तो ताबडतोब जागीच कोसळला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण तरीही त्याचा मृत्यू झाला. फिल ह्यूजने वयाच्या 25 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. एका दुखापतीमुळे केवळ त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवरच नव्हे तर त्याच्या जीवनप्रवासावरही पूर्णविराम लागला.

2. मार्क बाउचर
मार्क बाउचर (Mark Boucher) हा क्रिकेटच्या इतिहासातील महान यष्टिरक्षकांमध्ये गणला जातो. ग्रॅम स्मिथच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिष्ठित संघाचा तो भाग होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आजही त्याच्या नावावर आहे. मात्र, अशा या तेजस्वी क्रिकेटपटूची कारकीर्द अत्यंत दुर्दैवीपणे संपली. 2012 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर मार्क बाउचरने त्याचा 150 वा कसोटी सामना खेळता आला असता आणि या सामन्यात त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 1,000 विकेट्स पूर्ण करता आले असते.

मात्र, त्याआधी, सॉमरसेटविरुद्धच्या सराव सामन्यात इम्रान ताहीरची गुगली स्टंपवर आदळली आणि त्यानंतर एक चेंडू स्टंपवरून उडून बाउचरच्या डाव्या डोळ्यात आदळला आणि त्याला दुखापत झाली. त्याच्या डोळ्याची दुखापत इतकी गंभीर होती की त्यानंतर त्याला निवृत्त व्हावे लागले आणि 467 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर फक्त 998 विकेट्स नोंदवल्या गेल्या.

3.नाथन ब्रॅकन
नॅथन ब्रॅकन (Nathan Bracken) हा एकेकाळी ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचा महत्त्वाचा भाग होता. त्याच्या उंची आणि केसांमुळे त्यांची वेगळी ओळख होती. 2008 मध्ये तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज होता. मात्र, 2009 मध्ये गुडघ्याची दुखापत आणि डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे त्याची कारकीर्द वेळेपूर्वीच संपुष्टात आली. यानंतर त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आणि तब्बल 10 वर्षांनंतर त्याला भरपाई मिळाली. पण या सगळ्यात ऑस्ट्रेलियाने आपला एक आश्वासक गोलंदाज गमावला.

4.क्रेग कीस्वेटर
इंग्लंडचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज क्रेग किस्वेटर (Craig Kieswetter) नॉर्थहॅम्प्टनशायरविरुद्धच्या काऊंटी सामन्यादरम्यान डेव्हिड विलीचा छोटा चेंडू खेळताना जखमी झाला. विलीचा चेंडू हेल्मेटच्या आत जाऊन कीस्वेटरच्या डोळ्याला लागला. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, अशाप्रकारे त्याची कारकीर्द संपुष्टात आली. किस्वेटर या कारणामुळे वयाच्या 27 व्या वर्षी निवृत्त झाला.