NZvsENG: रविंद्र आणि कॉनवेची द्विशतकी भागीदारी इंग्लंडवर पडली भारी, ९ विकेट्सने जिंकला सामना

ICC World Cup 2023 NZ vs ENG: विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या गतविजेत्या इंग्लंडचा (New Zealand vs England) नऊ गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (5 ऑक्टोबर) न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकांत नऊ गडी गमावून 282 धावा केल्या. न्यूझीलंडने 36.2 षटकात 1 विकेट गमावत 283 धावा करत सामना जिंकला.

न्यूझीलंड संघाने 13व्या विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांनी गतविजेत्या इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला.

रचिन आणि कॉनवेची 273 धावांची नाबाद भागीदारी 
न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रचिन रवींद्र (Rachin Ravindra) यांनी कमाल केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची नाबाद भागीदारी केली. कॉनवेने 121 चेंडूत नाबाद 152 धावा केल्या. रचिनने 96 चेंडूत 123 धावा केल्या. कॉनवेने आपल्या खेळीत 19 चौकार आणि तीन षटकार मारले. तर रचिनने ११ चौकार आणि पाच षटकार मारले. दोघांच्या आक्रमक फलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल दिसत होते. इंग्लंडकडून फक्त सॅम करनने एक विकेट घेतली. रचिनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

https://youtu.be/j_RAemrZOnM?si=AzEv6lHWz-E94ZLF

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole