PUBG खेळता खेळता प्रेमात पडले, चार मुलांची आई असलेली पाकिस्तानी महिला प्रियकरासाठी आली भारतात

Viral News: लोक करमणूकीसाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, लिंकडीन याशिवाय ऑनलाईन मोबाईल गेम्समध्ये लोक गुंतलेले असतात. असेच ऑनलाईन पब्जी गेम खेळणारा एक भारतीय तरुण चार मुलांची आई असलेल्या एका पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात पडला. ती महिलाही भारतीय तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली आणि त्याच्यासाठी अवैधरित्या सीमा ओलांडून भारतात आली. (India Pakistan PUBG)

पब्जी गेम खेळणारा भारतीय तरुण सचिन चार मुलांच्या पाकिस्तानी आई सीमाच्या प्रेमात पडला. ही महिला प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती अवैधरित्या तिच्या चार मुलांसह भारतात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली. ही बातमी दोन्ही देशात वाऱ्यासारखी परसली.

यानंतर पाकिस्तानी महिला सीमाचा पती गुलाम हैदर याला आपल्या पत्नीच्या प्रियकराबाबत समजल्यानंतर त्याने भारत सरकारकडे त्याच्या पत्नी आणि मुलांना सुरक्षित पाकिस्तानात पाठवण्याची विनंती केली आहे. सीमा यांचे पती गुलाम हैदर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली असून, “त्यांची पत्नी आणि चार मुलांना पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे”. त्या व्यक्तीने व्हिडीओ बनवून भारत सरकारला हे आवाहन केले आहे. ती व्यक्ती सध्या सौदी अरेबियात आहे जिथे तो काम करतो.