मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो; नाना पटोले बरळले

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचं एक बेताल वक्तव्य समोर आले आहे.  या व्हिडीओमध्ये ते मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पटोले यांचा हाच व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे . हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने  मारण्याची भाषा केल्याने कॉंग्रेसवर मात्र आता टीका होऊ लागली आहे.

व्हिडीओमध्ये पटोले नेमकं काय म्हणाले?

“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडीओची ‘आझाद मराठी’ पुष्टी करत नाही.