“मी रोहित-विराटसारखा हिरो बनू शकलो असतो, पण धोनीमुळे…”, माजी क्रिकेटरचे MS Dhoni वर आरोप

Manoj Tiwari Blames MS DHoni: प्रदीर्घ काळ टीम इंडियातून बाहेर राहिल्यानंतर मनोज तिवारीने (Manoj Tiwari) क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र निवृत्तीनंतर त्याने महेंद्रसिंग धोनीवर (Mahendra Singh Dhoni) प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने कर्णधार म्हणून धोनीच्या निर्णयावर टीका केली आहे. वास्तविक, मनोज तिवारी म्हणाला की, शतक झळकावल्यानंतरही त्याला संघातून वगळण्यात आले.

38 वर्षीय मनोज तिवारीने (Manoj Tiwari)  कोलकाता येथील स्पोर्ट्स जर्नलिस्ट क्लबमध्ये एका सत्कार समारंभाच्या वेळी पत्रकारांना सांगितले की, ‘मला महेंद्रसिंग धोनीला विचारायचे आहे की 2011 मध्ये शतक झळकावल्यानंतर मला प्लेइंग इलेव्हनमधून का वगळण्यात आले? माझ्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे हिरो बनण्याची क्षमता होती, पण मी बनू शकलो नाही. आज जेव्हा मी टीव्हीवर पाहतो की अनेकांना अधिक संधी मिळत आहेत, तेव्हा मला वाईट वाटते.’

तिवारीने 2011 मध्ये चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 104 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली होती. त्याने 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 287 धावा केल्या होत्या, अशा उल्लेखनीय कामगिरीनंतरही दुर्लक्षित राहिल्याने तिवारीने संघ निवड प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले होते. खरं तर, ही उल्लेखनीय कामगिरी असूनही, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील पुढील 14 सामन्यांसाठी त्याला वगळण्यात आले होते. तिवारीने तीन टी20 सामन्यांमध्येही भाग घेतला, जिथे त्याने 12 धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा