Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Jayant Patil News: लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भाजपाशी हात मिळवला. तसेच काँग्रेसचे निष्ठावान नेते अशोक चव्हाण यांनीही भाजपात सहभागी होत सर्वांनाच धक्का दिला. असे असताना आता आणखी एक मोठा नेता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असलेला नेता म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) असल्याची चर्चा आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच लोकांची रोज चर्चा असते. 100 आमदार असले तरी सुद्धा आमच्याकडेचे लोकं त्यांना हवे आहेत. याचा अर्थ आमच्यात काहीतरी टॅलेंट आहे, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

उन्हाळा वाढत चालला आहे. 8 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने यूपीआय विरोधात व्हाईट पेपर काढले. निशिकांत दुबे यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात आरोप केले की आदर्श घोटाळ्यात काही गोष्टी आहेत. आदर्श घोटाळा अशोक चव्हाण यांनी केला मी नाही बोलत पण हे भाजप बोलते. भाजपचे भ्रष्टाचार जुम्ला पार्टी हे मॉडेल तयार झालं आहे. ज्याच्यावर आरोप करतात दुसऱ्या दिवशी तोच नेता भाजपमध्ये जातो, असं म्हणत महाविकास आघाडीसोडून महायुतीत जाण्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं